पुढील २०-२५ वर्षांत भारताचे ‘स्पेस स्टेशन’ (अंतराळातील स्थानक) ! – ‘इस्रो’चे प्रमुख एस्. सोमनाथ

नवी देहली – भारत पुढील २०-२५ वर्षांत अंतराळात स्वत:चे ‘स्पेस स्टेशन’ स्थापेल. गगनयान मोहिमेनंतर ‘स्पेस स्टेशन’ (अंतराळातील स्थानक) बनवण्याचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती इस्रोचे प्रमुख एस्. सोमनाथ यांनी एका चिनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली.