भारत-चीन सैनिकी स्तरावरील चर्चेत सीमेवर शांतता राखण्यावर एकमत

भारत चीन सीमा विवाद

नवी देहली : भारत आणि चीन यांच्या सैन्यामध्ये ‘कॉर्प्स कमांडर’ स्तरावरील चर्चेची २० वी फेरी ९ आणि १० ऑक्टोबर या दिवशी लडाख सेक्टरमधील चुशुल-मोल्डोजवळ झाली. या संदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसारित केलेल्या निवेदनानुसार, या बैठकीत भारत आणि चीन यांच्यातील वास्तविक नियंत्रण रेषा अन् इतर सूत्रे यांवर चर्चा झाली.

 (सौजन्य : Prabhasakshi)

लडाखमधील डेपसांग आणि डेमचोक येथून सैन्य मागे घेण्यासाठी भारतीय सैन्याधिकार्‍यांनी चीनवर दबाव आणला. भारत आणि चीन यांनी सीमाभागात शांतता राखण्याचे मान्य केले आहे. दोन्ही देशांनी मोकळ्या पद्धतीने त्यांचे विचार मांडले.

संपादकीय भूमिका

चीनने सीमेवर शांतता राखण्याविषयी सहमती दर्शवली असली, तरी त्याच्यावर विश्‍वास ठेवता येणार नसल्याने भारताला नेहमीच सतर्क रहावे लागणार आहे !