Defence Land Under Encroachment : देशात संरक्षण विभागाच्या १० सहस्र २४९ एकर भूमीवर अतिक्रमण – संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ

संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ

नवी देहली – देशभरात संरक्षण विभागाची १८ लाख एकर भूमी असून तिच्या १० सहस्र ३५४ एकर भूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

अमेरिकी संस्थेद्वारे मिळालेल्या निधीची चौकशी करून दोषींना शिक्षा करावी ! – भाजपचे खासदार निशिकांत दुबे

भाजपचे खासदार निशिकांत दुबे

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी यू.एस्.ए.आय.डी.द्वारे (युनायटेड स्टेट एजन्सी ऑफ इंटरनॅशनल डेव्हलपमेंटद्वारे) अमेरिका भारतात फूट पाडण्यासाठी विविध संस्थांना पैसे दिले जात असल्याचा दावा करत या प्रकरणाच्या चौकशी करण्याची सरकारकडे मागणी केली. तसेच दोषींना शिक्षा करण्यात यावी, असेही ते म्हणाले. दुबे म्हणाले की, विरेाधकांनी सांगावे की, यू.एस्.ए.आय.डी.ने जॉर्ज सोरोस यांच्या ओपन सोसायटी फाऊंडेशनला ५ सहस्र कोटी रुपये भारतात फूट पाडण्यासाठी दिले कि नाही ? त्यांनी राजीव गांधी फाऊंडेशनला पैसे दिले कि नाही ?

संपादकीय भूमिका 

संरक्षणदल स्वतःच्या भूमीचे रक्षण करू शकत नाही, हे लज्जास्पद ! सरकारने केवळ माहिती न देता युद्धापातळीवर ही भूमी मुक्त करण्याचा मोहीम राबवून त्याची माहिती नंतर संसदेत द्यावी !