पोलिसांची सलग तिसर्या दिवशी अमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई

पणजी, २७ डिसेंबर (वार्ता.) – गुन्हे अन्वेषण विभागाने दोनापावला येथे २६ डिसेंबरच्या रात्री धाड टाकून मुंबईस्थित स्ट्रोमे कॅनडी आणि व्हेलेंटाईन परेरा, तसेच भाग्यनगरस्थित आयन अली खान यांना ८ लाख ५० सहस्र रुपये किमतीच्या अमली पदार्थांसह कह्यात घेतले आहे. पोलिसांनी सलग तिसर्या दिवशी अमली पदार्थांच्या विरोधात ही मोठी कारवाई केली आहे. हे अमली पदार्थ ‘मर्सिडीस बेंझ’ गाडीत लपवून ठेवले होते. पोलिसांनी या कारवाईत ‘मर्सिडीस बेंझ’ गाडीही कह्यात घेतली आहे.
सासष्टी तालुक्यात अमली पदार्थांचे सेवन करण्याचे वाढते प्रकार !
सासष्टी तालुक्यात अमली पदार्थांचे सेवन करण्याचे वाढते प्रकार घडत आहेत. कोलवा, मडगाव आणि फातोर्डा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हे प्रकार घडत आहेत. या भागांमध्ये गांजाची विक्री सर्रासपणे चालू असल्याचा आरोप होत आहे. चालू वर्षी २५ डिसेंबरपर्यंत सासष्टी पोलिसांनी अमली पदार्थांच्या विरोधात १९ प्रकरणे नोंद केली आहेत, तर गतवर्षी ३५ प्रकरणांची नोंद झाली होती
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
३ किलो गांजा, चारचाकी, दुचाकीसह १० लाख ५० सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात !
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !