४९ दिवसांत गुन्हा न नोंदवल्याने देहली उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले !

मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेल्याचे प्रकरण

न्यायालयाने अशा पोलिसांना केवळ फटकारण्यासह कठोर शिक्षाही सुनवावी, अशी राष्ट्रप्रेमी नागरिकांची अपेक्षा आहे !

नवी देहली – येथे एका हिंदु तरुणीला सय्यद मुस्तफा नावाच्या मुसलमान तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले. याची तक्रार मुलीच्या वडिलांनी करूनही ४९ दिवसांत पोलिसांनी गुन्हा नोंद केला नाही. यावरून देहली उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले आहे.

न्यायालयाने या तरुणीला शोधून न्यायालयात उपस्थित करण्याचा आदेश पोलिसांना दिला. मुस्तफा या तरुणीला कोलकाता येथे घेऊन गेला असून तेथे त्याने तिच्याशी विवाह केल्याचे सांगितले जात आहे. ही तरुणी बी.टेक. शिकलेली असून तिचे वडील मजूर आहेत.