महापालिकेची सर्व रुग्णालयांना नोटीस
पुणे – तातडीच्या उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांकडून अथवा त्यांच्या नातेवाइकांकडून अनामत रक्कमेची मागणी करू नये. रुग्णांवर पहिल्यांदा उपचार करावेत, अशी नोटीस महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व ८६० रुग्णालयांना पाठवली आहे, अशी माहिती आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये अनामत रक्कम न भरल्यामुळे तातडीच्या उपचारांअभावी गर्भवती मातेचा मृत्यू झाला. रुग्णालयांनी अनामत रक्कम भरण्याची, तसेच वैद्यकीय नियमांचे पालन न केल्यास १८००२३३४१५१ या ‘टोल फ्री’ क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.