एस्.टी. महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती !

प्रताप सरनाईक

मुंबई – एस्.टी. महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रताप सरनाईक हे एस्.टी. महामंडळाचे २६ वे अध्यक्ष असणार आहेत. यापूर्वी शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले हे एस्.टी.महामंडळाचे अध्यक्ष होते.

मनोगत व्यक्त करतांना प्रताप सरनाईक म्हणाले, ‘‘एस्.टी. ही महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची लोकवाहिनी आहे. भविष्यात एस्.टी.ला आर्थिकदृष्ट्या सक्षम करून दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी मी कटीबद्ध आहे.’’

या पदावर नियुक्त करून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याविषयी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.