सातारा, १० एप्रिल (वार्ता.) – खटाव तालुक्यातील म्हासुर्णे गावात खैरओढा येथे गजानन अनंत खैर यांनी पीडित मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी खैर यांना पॉक्सो आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दोषी ठरवण्यात आले. वडूज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कोल्हे यांनी खैरे यांना २० वर्षे सश्रम कारावास आणि ४ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.
पीडित मुलगी आणि तिचे आई-वडील ऊसतोड कामासाठी म्हासुर्णे येथे आले होते. आरोपी खैरे यांनी पीडित मुलीला भ्रमणभाष दाखवतो, असे सांगून अन्यत्र नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याविषयी वडूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता.