Varanasi Rape Case : वाराणसीमध्ये विद्यार्थिनीवर २३ तरुणांकडून ७ दिवस सामूहिक बलात्कार

६ आरोपींना अटक

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथे होळीच्या कालावधीत एका विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर २३ तरुणांनी ७ दिवस सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. या तरुणांनी बलात्काराचे व्हिडिओ बनवले आहेत. ही घटना २९ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत घडली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यात १२ जणांची नावे असून ११ जण अज्ञात आहेत. ही विद्यार्थिनी एका हॉटेलशी संलग्न असलेल्या स्पा सेंटरमध्ये काम करते. या प्रकरणी पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली आहे. यात साजिद, आयुष सिंह, दानिश खान, अनमोल, इम्रान आणि आणखी एकाचा समावेश आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.

संपादकीय भूमिका

अशा घटनांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजेत !