
बेंगळुरू (कर्नाटक) – बेंगळुरू शहरातील बीटीएम् लेआउटमधील सुद्दागुंटेपल्या येथे भररस्त्यात एका तरुणाने एका मुलीशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही घटना ‘सीसीटीव्ही कॅमेर्या’त चित्रित झाली आहे. या अतिप्रसंगानंतर आरोपी तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला. कर्नाटक पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवून या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले आहे. राज्यात महिलांवरील अत्याचारांत वाढ झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. (हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|
(म्हणे) ‘मोठ्या शहरांत अशा घटना घडणारच !’ – गृहमंत्री जी परमेश्वरमोठ्या शहरांत अशा घटना घडणारच, अशी असंवेदनशील प्रतिक्रिया कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी या घटनेवर व्यक्त केली. याविषयी जी काही कायदेशीर कारवाई करायची असेल, ती कायद्यानुसार केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. बेंगळुरूतील एक व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर जी परमेश्वर यांनी ही प्रतिक्रिया दिली, असे ‘इंडिया टुडे’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. संपादकीय भूमिकाअशांच्या राज्यात गुन्हेगारी कधी तरी घटेल का ? अशांना निवडून देणार्यांना ही शिक्षाच म्हणावी लागेल ! |