पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ४३५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत

पिंपरी (पुणे) – महापालिकेच्या करसंकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी अनेक योजना राबवल्या. जप्तीपूर्व नोटीस, कर थकलेल्या मालमत्ता लाखबंद (सील) करणे, नळजोडणी खंडित करणे आदी उपायांचा उपयोग केला. तरीही शहरातील १ लाख ३० सहस्र ८०३ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला नाही. त्यांच्याकडे ४३५ कोटी रुपयांच्या कराची थकबाकी आहे.