माढा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे आणि रणजितसिंह शिंदे यांची ‘ईडी’कडून चौकशी !

आतापर्यंत पिता पुत्राची ३ वेळा चौकशी झाली आहे. संपूर्ण प्रकरणात ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचे सांगितले जात आहे. सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम आणि शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी ‘ईडी’कडे तक्रार केली होती.

संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठातील शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला भडंगे यांचे निलंबन !

विद्यार्थिनींकडे ५० सहस्र रुपयांची लाच मागितल्याचे प्रकरण

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची अपयशी कारकीर्द !

महागाई ! अन्नधान्य, दूध, खाण्याचे सर्व पदार्थ, तसेच बांधकाम उद्योग यांच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानमधून लाखो शरणार्थी पाकिस्तानमध्ये शरण आले आहेत. लोकांना महागाई अल्प आणि हाताला काम पाहिजे असते. तसे काहीही झाले नाही. त्यामुळे पाकिस्तानी जनता सरकारच्या विरोधात गेली आहे.

(म्हणे) ‘जाती-धर्मात कटुता आणणाऱ्या विचाराला माझे आजोळ थारा देणार नाही !’ – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

ज्या पक्षातील प्रत्येक मंत्री, नेते, कार्यकर्ते यांच्यावर प्रतिदिन कुठे ना कुठे भ्रष्टाचार, बलात्कार केल्याचे आरोप होतात, अशा पक्षाच्या प्रमुखांना ‘संस्कार’ वगैरे शब्द वापरणे शोभते का ?

भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा हवीच !

गुन्हेगारांना कायद्याचे भय न वाटण्यामागील कारणांचा अभ्यास करून त्यामध्येही सुधारणा करायला हवी, असे जनतेला वाटते. ही सर्व प्रक्रिया तत्त्वनिष्ठपणे आणि प्रामाणिकपणे केली, तरच देशातील भ्रष्टाचार अन् गुन्हेगारी संपेल, हे नक्की !

वाहतूक पोलीस जनतेकडून करत असलेल्या पैसे वसुलीची गृहविभागाने गांभीर्याने नोंद घ्यावी !

चौकात पैसे वसूल करणारा वाहतूक पोलीस छोटा असतो; पण त्याच्या डोक्यावरचे (वरिष्ठ) पोलीस निरीक्षक किंवा सर्कल अधिकारी यांच्याकडे आपण पहात नाही. पोलिसांचे स्थानांतर करण्यासाठी दिलेले पैसे वसूल करण्यासाठी हे सर्व प्रकार केले जातात.

भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांविषयी सरकारकडून समाधानकारक उत्तरे नाहीत ! – देवेंद्र फडणवीस

मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती यशवंत जाधव यांच्या विरोधात ‘ईडी’ने कारवाई केल्यानंतर याविषयी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी विधानसभेत चकार शब्दही काढला नाही.

व्यावसायिक भ्रमणभाष मनोर्‍यांचे २६ कोटी रुपये विद्युत् शुल्क माफ करण्यात आले !

ऊर्जा विभागामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप !

…. पण ‘पैशाचा हिशेब देऊ’, असे कुणी म्हणत नाही ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदू विधीज्ञ परिषद

दोन्हीकडून दोन्हीकडे धाडी टाकाव्यात. काळा पैसा तरी बाहेर येईल. कोण किती कसे खात होते, कुणाचे लागेबांधे कसे आहेत ? हे लोकांना पुन्हा पुन्हा स्पष्ट होत राहील !

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यस्त ! – परशुराम उपरकर, राज्य सरचिटणीस, मनसे

आर्थिक घोटाळे अनेक अधिकारी एकमेकांच्या संगनमताने करतात. हेही उघड होत आहे. त्यामुळे आघाडीतील तिन्ही पक्ष आणि भाजप हे अपकीर्त होत आहेत.