
मुंबई, २४ मार्च (वार्ता.) – धाडी पडल्यानंतर ‘यामागे राजकीय डाव आहे’, ‘ही छळवणूक चालली आहे’, ‘यामागे घाणेरडे राजकारण आहे’, आदी विविध प्रतिक्रिया दिल्या जातात; परंतु ‘आमच्याकडे असलेल्या पैशांचा हिशेब देऊ’, असे उत्तर मात्र मी तरी पाहिलेले नाही, असे मार्मिक परंतु वस्तुस्थिती दर्शवणारे ‘ट्वीट’ हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी २३ मार्च या दिवशी केले आहे.

— Ichalkaranjikar V.S. (@ssvirendra) March 23, 2022
विविध आर्थिक अपहाराच्या प्रकरणांत केंद्रीय स्तरावरील अंमलबजावणी संचनालय, आयकर विभाग, तर राज्यस्तरावरील आर्थिक अन्वेषण गुन्हे अन्वेषण यंत्रणा आदी यंत्रणाकडून टाकण्यात येत असलेल्या धाडी आणि त्यांवर सत्ताधारी अन् विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत असलेल्या प्रतिक्रिया यांविषयी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी वरील टिपणी केली आहे.
यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, दोन्हीकडून दोन्हीकडे धाडी टाकाव्यात. जप्तीची कारवाई करावी. अनधिकृत बांधकामे पाडून टाकावीत. मजुरापासून ते साखरेपर्यंत सगळ्यांचे सहकाराचे कारभार बाहेर आणावेत. अजून काही करायचे असेल, तर तेही करून टाकावे. त्यानिमित्त काळा पैसा तरी बाहेर येईल. कोण किती कसे खात होते, कुणाचे हात कुठे पोचले होते ? कुणाचे लागेबांधे कसे आहेत ? हे लोकांना पुन्हा पुन्हा स्पष्ट होत राहील.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !