५ सहस्र रुपयांची लाच घेतांना पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत भोसले यांना अटक

अटक झाल्यानंतर वर्षानुवर्षे खटले प्रलंबित रहातात आणि प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत संबंधित शासकीय चाकरीचा लाभ घेत रहातात. त्यामुळे जोपर्यंत तात्काळ निकाल आणि कठोर शिक्षेची तरतूद होत नाही तोपर्यंत अशा प्रकारांना आळा घालणे हा एक फार्सच ठरत आहे

लाच मागितल्याप्रकरणी ठाणे वाहतूक शाखेचा हवालदार कह्यात

तक्रारदार रिक्शा चालकाच्या रिक्शावर वाहतूक विभागाने केलेली कारवाई रहित करण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेचे हवालदार गोकुळ झाडखडे यांनी सुमित पवार यांच्या वतीने ३०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न!

जेजुरी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करू नये !

जुरीमध्ये पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते १३ फेब्रुवारीला होणार होते.

देवगड पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार !

देवगड पंचायत समितीच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये ४ कर्मचार्‍यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. या रकमेमधून त्यांनी मोठे बंगले बांधले असून गावाकडे स्थावर संपत्ती विकत घेतली आहे.

माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज केल्यावर जागे होणारे सरकार नको ! स्वतःहून कृती करणारे हवेत !

‘उत्तरप्रदेशात मदरशांच्या नावाखाली सरकारी निधी लाटला गेला तसेच शिक्षक भरतीत घोटाळा, विद्यार्थ्यांच्या संख्येत गडबड हे सर्व माहिती अधिकर कायद्यामुळे उघड झाले.

जालना येथील २५५ कोटी रुपयांच्या सूक्ष्म सिंचन घोटाळ्याची चौकशी चालू

घोटाळे आणि भ्रष्टाचार यांमध्ये राजकारणी अन् प्रशासन यांचा कोणीही हात धरू शकणार नाही, अशी स्थिती असणारा जगातील एकमेव देश भारत !

पारनेर येथील वर्धमान ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत अपहार, शाखाधिकारी, अध्यक्षांसह १४ जणांविरोधात गुन्हा नोंद

अशा लाचखोरांवर कठोर कारवाई केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !

आर्थिक अपव्यवहार आणि अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याच्या प्रकरणी तत्कालीन विश्‍वस्तांविरुद्ध गुन्हा नोंद करावा !

आर्थिक अपव्यवहार झाला असेल, तर संबंधितांना शिक्षा व्हायलाच हवी; मात्र हिंदूंच्या धर्मशास्त्राशी निगडित विषयांत माननीय न्यायालयाने शंकराचार्य किंवा हिंदूंचे धर्मगुरु यांचे मत विचारात घ्यावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

नगरसेवक अण्णा लेवे यांचे आरोप तथ्यहीन ! – नगराध्यक्षा माधवी कदम

केवळ विहित माहिती दिली नाही म्हणून प्रशासन भ्रष्टाचारात बरबटलेले आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. कोरोना काळातील खरेदीविषयीची माहिती एक नगरसेवक किंवा विश्‍वस्त म्हणून अण्णा लेवे यांनी घेणे महत्त्वाचे होते.

कंत्राटदारांच्या भ्रष्टाचाराविषयी मुंबई महापालिकेत निनावी पत्र

कंत्राटदार हातचलाखी करत असल्याचे निनावी पत्र महापालिकेत आले आहे. ‘सॅप’ प्रणालीमध्ये हस्तक्षेप करत काही मोजक्या कंत्राटदारांना साहाय्य केले जात असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.