महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांना त्वरित निलंबित करण्याचा आदेश !

राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिका यांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाचखोर अधिकारी किंवा कर्मचारी यांनी लाच घेतल्याचे आढळून आल्यावर त्यांना सेवेतून तात्काळ निलंबित करावे, असा आदेश नगरविकास विभागाने दिला आहे.

शासकीय वसतिगृहाच्या महिला गृहपालाला १५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले !

तालुक्यातील उत्तर पार्ले येथील एका शासकीय वसतिगृहाच्या महिला गृहपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले.

४० सहस्र रुपयांची लाच घेतांना अभियंत्याला अटक !

येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संजय पाटील या शाखा अभियंत्याच्या घरामध्ये २७ लाखांची रोकड आणि ८५ तोळे सोने लाचलुचपत विभागाने टाकलेल्या धाडीत मिळाले आहे.

पुण्यात लाच घेतांना महिला तलाठ्याला अटक, एका धर्मांधावर गुन्हा नोंद !

लाचखोरीत महिला आघाडीवर असणे दुर्दैवी ! नको त्या गोष्टीत महिलांनी पुरुषांची बरोबर न करता लाच घेणार्‍यांना उघड करण्यामध्ये पुढाकार घ्यावा. धर्माचरणानेच नीतिमान अधिकारी निर्माण होतील, हे नक्की !

लाच घेतल्याच्या प्रकरणी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठाचे प्राध्यापक महंमद खालिद मोइन यांना अटक

प्राध्यापक महंमद खालिद मोइन हे अनेक खासगी बांधकाम व्यावसायिक, वास्तूविशारद आणि दलाल यांच्या संगनमताने विविध प्रकारच्या फसवणुकीच्या कारवायांमध्ये गुंतले होते. लाच घेऊन ते विविध बांधकाम प्रकल्पांना बनावट प्रमाणपत्र देत होते.

मुंबईचे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी फरार !

मुंबादेवी परिसरातील अंगडिया या व्यावसायिकांकडून खंडणी घेतल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांच्या चौकशीतून सौरभ त्रिपाठी यांचे नाव पुढे आले होते.

भरतपूर (राजस्थान) येथे नव्या रस्त्याची अवघ्या ५ दिवसांत दुर्दशा !

काँग्रेसच्या राज्यात जनतेचा विकास करण्याऐवजी स्वतःचा आर्थिक विकास करून घेणारे काँग्रेसचे मंत्री आणि लोकप्रतिनिधी !

तेजस्वी सातपुते यांच्यावर कारवाई करण्याची मागणी !

आरोप असलेली व्यक्ती पोलीस विभागात कार्यरत असणे, हे यंत्रणेसाठी धोकादायक आहे. त्यांच्याविषयी पोलीस प्रशासनाची काय भूमिका आहे, हे जनतेला समजले पाहिजे.

राज्यातील साखर कारखाने अल्प मूल्यात खासगी लोकांना विकल्याच्या चर्चेत तथ्य नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

साखर कारखाना विक्रीत २५ सहस्र कोटी रुपयांचा अपहार झाल्याची अण्णा हजारे यांची तक्रार ! – योगेश सागर, आमदार, भाजप

देवेंद्र फडणवीस यांना आरोपी नव्हे, तर त्यांचा जबाब घेण्यासाठी नोटीस पाठवली ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

आम्ही कारागृहात जाण्याला घाबरत नाही ! – देवेंद्र फडणवीस