साखर कारखान्यांतील भ्रष्टाचार !

देशात वस्त्रोद्योगानंतर जर कुठल्या उद्योगाचे नाव घेतले जात असेल, तर तो साखर उद्योगच आहे; मात्र हीच सहकारी साखर कारखानदारी सध्या संकटात आणि भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकली आहे.

कोटकामते (जि. सिंधुदुर्ग) ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणी सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा नोंद

देवगड तालुक्यात शिक्षण विभागात झालेल्या लाखो रुपयांच्या घोटाळ्याच्या पाठोपाठ कोटकामते ग्रामपंचायतीमधील घोटाळा उघड होण्याची ही दुसरी घटना आहे.

ममता बॅनर्जी यांचा पुतण्या आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांची ‘ईडी’कडून चौकशी !

‘ईडी’ला बॅनर्जी यांच्याशी संबंधित पुरावे मिळाल्याने त्यांची अन् त्यांची पत्नी यांची चौकशी केल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

म्हाडाची अनुमती न घेता नाशिक महापालिकेने दिल्या गृहनिर्माण योजनेला अनुमती, कोट्यवधींच्या घोटाळ्याची शक्यता !

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची चौकशीची घोषणा !

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांना त्वरित निलंबित करण्याचा आदेश !

राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिका यांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाचखोर अधिकारी किंवा कर्मचारी यांनी लाच घेतल्याचे आढळून आल्यावर त्यांना सेवेतून तात्काळ निलंबित करावे, असा आदेश नगरविकास विभागाने दिला आहे.

शासकीय वसतिगृहाच्या महिला गृहपालाला १५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले !

तालुक्यातील उत्तर पार्ले येथील एका शासकीय वसतिगृहाच्या महिला गृहपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले.

४० सहस्र रुपयांची लाच घेतांना अभियंत्याला अटक !

येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संजय पाटील या शाखा अभियंत्याच्या घरामध्ये २७ लाखांची रोकड आणि ८५ तोळे सोने लाचलुचपत विभागाने टाकलेल्या धाडीत मिळाले आहे.

पुण्यात लाच घेतांना महिला तलाठ्याला अटक, एका धर्मांधावर गुन्हा नोंद !

लाचखोरीत महिला आघाडीवर असणे दुर्दैवी ! नको त्या गोष्टीत महिलांनी पुरुषांची बरोबर न करता लाच घेणार्‍यांना उघड करण्यामध्ये पुढाकार घ्यावा. धर्माचरणानेच नीतिमान अधिकारी निर्माण होतील, हे नक्की !

लाच घेतल्याच्या प्रकरणी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठाचे प्राध्यापक महंमद खालिद मोइन यांना अटक

प्राध्यापक महंमद खालिद मोइन हे अनेक खासगी बांधकाम व्यावसायिक, वास्तूविशारद आणि दलाल यांच्या संगनमताने विविध प्रकारच्या फसवणुकीच्या कारवायांमध्ये गुंतले होते. लाच घेऊन ते विविध बांधकाम प्रकल्पांना बनावट प्रमाणपत्र देत होते.

मुंबईचे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी फरार !

मुंबादेवी परिसरातील अंगडिया या व्यावसायिकांकडून खंडणी घेतल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांच्या चौकशीतून सौरभ त्रिपाठी यांचे नाव पुढे आले होते.