काँग्रेसचे आमदार नसीर अहमद यांच्या मुलाला मद्यपान करून पोलिसांवर प्राणघातक आक्रमण केल्याच्या प्रकरणी अटक

धर्मांधांची ही हिंसाचारी प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी त्यांच्यासाठी शरीयतनुसार कठोर शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

नव्या कृषी कायद्यातून शेतकर्‍यांचा कसलाही लाभ नाही ! – सतेज पाटील, गृहराज्यमंत्री, काँग्रेस

स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ राज्य केलेल्या काँग्रेसने त्या त्या वेळी शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवले असते, तर शेतकर्‍यांवर आंदोलन करण्याची वेळ आलीच नसती !

पुन्हा हिंदु राजेशाही !

लोकशाही स्थापन होऊन अवघी काही वर्षेच झाली असतांना आता नेपाळी हिंदूंनी देशात पुन्हा केवळ राजेशाही स्थापित करण्याची नव्हे, तर नेपाळला पुन्हा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे जनआंदोलने केली जात आहेत आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

केरळमधील जैव तंत्रज्ञान संस्थेच्या परिसराला पू. गोळवलकर गुरुजी यांचे नाव देण्याचा निर्णय

राज्यातील राजीव गांधी सेंटर फॉर बॉयोटेक्नॉलॉजी संस्थेच्या परिसराला द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकर गुरुजी यांचे नाव देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा राज्यातील साम्यवादी सरकार आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांनी विरोध चालू केला आहे.

‘भारत बंद’चा गोव्यावर कोणताही परिणाम होणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आप यांचा पाठिंबा.
आंदोलनाला पाठिंबा म्हणजे शेतकर्‍यांना लुटणार्‍या दलालांना पाठिंबा !

मोरजीतील काँग्रेस उमेदवाराचा मगोच्या उमेदवाराला पाठिंबा

राज्यात १२ डिसेंबरला होणार्‍या जिल्हा पंचायत निवडणुकीत मोरजीतील काँग्रेसचे उमेदवार महेश कोंडारकर यांनी मगोपचे उमेदवार श्रीधर मांजरेकर यांना पाठिंबा घोषित केला आहे.

८ डिसेंबरच्या भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा

‘बंद’ म्हणजे स्वतःच्या मागण्यांसाठी देश आणि जनता यांना वेठीस धरून त्यांची सहस्रो कोटी रुपयांची हानी करणारा गुन्हाच होय ! अशा प्रकारे हानी करणे जनताद्रोहच होय ! सरकारनेही कुणावर अशा प्रकारचे आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, याकडे लक्ष द्यायला पाहिजे !

अ‍ॅलेक्झांडर, मोगल, ब्रिटीश, सोनिया काँग्रेस हे त्यांच्या सामर्थ्यामुळे नाही, तर हिंदू संघटित नसल्याने यशस्वी झाले ! – भाजपचे सरचिटणीस सी.टी. रवि

आक्रमक शक्तींपासून आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्रित होण्याची वेळ आली आहे, असे विधान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि यांनी केले.

श्रीराममंदिरासाठी मिळणार्‍या अर्पणाचा हिशोब द्या ! – छत्तीसगडचे काँग्रेसचे मंत्री सिंहदेव यांची मागणी

मंदिरासाठी मिळणार्‍या अर्पणाचा हिशोब मागण्याचा प्रत्येक हिंदूला अधिकार आहे; मात्र आजन्म मंदिराला विरोध करणार्‍या काँग्रेसला हा अधिकार आहे का ? काँग्रेसने अप्रत्यक्षरित्या मंदिर होऊ नये, यासाठीच प्रयत्न केले होते, हे हिंदू विसरणार नाहीत !

बेंगळुरू दंगलीच्या प्रकरणी पसार असणार्‍या काँग्रेसच्या धर्मांध नेत्याला अटक

बेंगळुरू (कर्नाटक) येथे यावर्षी ११ ऑगस्टला धर्मांधांनी केलेल्या दंगलीच्या प्रकरणातील पसार असणार्‍या काँग्रेसच्या रकीब जाकीर या नेत्याला पोलिसांनी अटक केली.