शस्त्रक्रियांचे स्वयंघोषित ठेकेदार !

ही वेळ पॅथींमध्ये स्पर्धा लावून ‘कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ ?’ ही ठरवण्याची नाही. खेडोपाडी रुग्णसेवा बजावण्यास केव्हाही सिद्ध असणारे वैद्य निर्माण करण्याची ही वेळ आहे. यासाठी वैद्यकीय संघटनांनी स्वतःची ऊर्जा खर्ची घातली, तर समाजाचे भले होईल !

आयुर्वेद वैद्यांना शस्त्रकर्म करण्याच्या अनुमतीवर सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला नोटीस  

पदव्युत्तर आयुर्वेद वैद्यांना ३९ सामान्य शस्त्रकर्म, तसेच डोळे, कान, नाक आणि गळा यांच्या संदर्भातील १९ शस्त्रकर्म करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

कोंडेनूर (केरळ) येथील ‘नक्षत्रवना’तील वृक्षांच्या संदर्भात केलेले संशोधन !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या संशोधन गटाने केरळ राज्यातील कोंडेनूर येथील श्री नित्यानंद योगाश्रमात असलेल्या नक्षत्रवनातील वृक्षांची ‘यू.ए.एस्.’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

आयुर्वेदाचे सिद्ध झालेले श्रेष्ठत्व !

आजच्या घडीला आधुनिक वैद्यांकडून केल्या जाणार्‍या रुग्णांच्या विविध पडताळण्या आणि औषधांचा भडीमार यांमुळे रुग्णांचे आर्थिक शोषण होते. वैद्य रामराज सिंह यांनी माझ्यासह अनेक रुग्णांचे नाडीपरीक्षणाच्या माध्यमातून योग्य निदान केले.

सुश्रुतांच्या काळापासून आयुर्वेदात शस्त्रक्रियांचा उल्लेख आढळतो ! – केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक

‘माझीच उपचारपद्धत श्रेष्ठ’, असे कुणीही म्हणू नये. केंद्रशासनही कुणाची मक्तेदारी (मॉनोपॉली) मोडून काढू इच्छित नाही. एखाद्या औषधाने जर रुग्ण कायमचा बरा होत असेल, तर त्यामध्ये काय वावगे आहे ? आयुर्वेदात पदवी घेणारे किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले यांना शस्त्रक्रिया शिकवली जाते. सुश्रुतांच्या काळापासून आयुर्वेदात शस्त्रक्रियांचा उल्लेख आढळतो.

घरोघरी आयुर्वेद

ताप, अंगदुखी, उलटीची भावना, अंग जड वाटणे, भूक मंदावणे, वजन न वाढणे, अपत्यप्राप्तीसाठी अडचणी, मासिक पाळीशी संबंधित त्रास असलेल्यांनी काय टाळावे ?

आम्ही कोणत्याही पारंपरिक औषधाला मान्यता दिलेली नाही ! – जागतिक आरोग्य संघटनेचा दावा

आयुर्वेदीय औषधोपचाराने कोरोना बरा झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे कुणाच्या प्रमाणपत्रांची वाट न पहाता केंद्र सरकारने आयुर्वेदीय औषधोपचार करणार्‍यांना अभय देणे आवश्यक !

विनामूल्य; पण बहुमूल्य आयुर्वेदीय औषधे : काटेसावरीची फुले आणि मक्याच्या कणसांतील केस

साधारणपणे फेब्रुवारी – मार्च मासांत पाने नसलेला, पण तांबड्या रंगाच्या फुलांनी बहरलेला आणि खोडावर जाड काटे असलेला एक वृक्ष पटकन नजरेत भरतो. याला काटेसावर म्हणतात.

पू. दाभोलकरकाका यांना अनुभवायला आलेले आयुर्वेद उपचारांचे महत्त्व !

बद्धकोष्ठतेचा त्रास होत असतांना आधुनिक वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे पाणी पिण्याचे प्रमाण वाढवल्यावर कोणताही लाभ न होणे आणि आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे पाणी पिण्याचे प्रमाण न्यून केल्यावर पोटासंबंधीचे सर्व त्रास थांबणे

आयुर्वेदाने गायीच्या दुधाला ‘अमृत’ मानणे

आयुर्वेदाने गायीच्या दुधाला ‘अमृत’ मानले आहे. यात गायीचे दूध आणि तूप यांना ‘नित्य सेवनीय आहार’ म्हटले आहे. याच्या सेवनाने विकार होत नाही. अनेक तर्‍हेच्या रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गायीचे दूध, तूप तसेच पंचगव्यही लाभदायक आहे.