१. शारीरिक त्रास होत असतांना आधुनिक वैद्यांनी दिलेली औषधे घेऊन गुण न येणे; मात्र आयुर्वेदीय उपचार घेतल्यावर दुखणी दूर होणे
१ अ. सर्दीचा जुनाट आजार आयुर्वेदीय उपचाराने कायमचा दूर होणे : ‘मला अनेक वर्षांपासून सर्दीचा त्रास होता. मी अनेक आधुनिक वैद्यांकडे उपचार घेऊनही मला गुण येत नव्हता. त्यांच्या उपचारांनी मला तात्पुरते बरे वाटे; परंतु काही कालावधीनंतर मला पुन्हा त्रास चालू व्हायचा. मी ऐरोली सेक्टर ३ येथील वैद्य रामराज सिंह यांचे उपचार घ्यायला आरंभ केला. मी त्यांच्याकडून नियमित ६ मास उपचार घेतल्यावर माझी सर्दी कायमची नाहीशी झाली.
१ आ. आधुनिक वैद्यांनी संधिवाताचे निदान करून शस्त्रकर्म करायला सांगणे; परंतु त्यासाठी होणारा व्यय परवडणारा नसल्याने आयुर्वेदीय उपचार घेतल्यावर पाठदुखी नाहीशी होणे : पुढे कालांतराने मला हातांची हालचाल करणे अवघड होत होते. पाठ, पाय दुखणे आणि तळवे दुखणे, यांसाठी मी आधुनिक वैद्यांचे उपचार चालू केले. त्यांनी मला संधिवात झाल्याचे निदान केले. त्यावर औषधे घेऊनही फारसा गुण येत नव्हता. आधुनिक वैद्यांनी ‘मणक्याचे शस्त्रकर्म करावे लागेल. त्यासाठी ३ लाख रुपये व्यय होईल’, असे सांगितले. एवढा व्यय करण्याची आर्थिक स्थिती नसल्याने मी पुन्हा वैद्य रामराज सिंह यांच्याकडे उपचारासाठी गेलो. त्यांनी नाडीपरीक्षण करून औषधे दिली. त्यांच्या औषधांनी मला हळूहळू गुण येत होता आणि ६ मासांनी माझे दुखणे पूर्णतः नाहीसे झाले.
२. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या तुलनेत आयुर्वेदीय उपचाराची महानता लक्षात येणे
आजच्या घडीला आधुनिक वैद्यांकडून केल्या जाणार्या रुग्णांच्या विविध पडताळण्या आणि औषधांचा भडीमार यांमुळे रुग्णांचे आर्थिक शोषण होते. वैद्य रामराज सिंह यांनी माझ्यासह अनेक रुग्णांचे नाडीपरीक्षणाच्या माध्यमातून योग्य निदान केले. त्यांनी त्यांच्याकडे येणार्या रुग्णांना अचूक औषध देऊन अनेक जणांची आजारातून कायमची मुक्तता केली.
अशा वेळी आयुर्वेद आणि वैद्य रामराज सिंह हे देवदूतच ठरतात.’
– श्री. सुधाकर पाटील, ऐरोली, नवी मुंबई. (३१.८.२०१८)