२२ जानेवारी या दिवशी वाशीम जिल्ह्यात मद्य, मांस बंदी करा !

२२ जानेवारी या दिवशी श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरात मद्य, मांस व्यवहार बंद ठेवावे, यासाठी सकल हिंदु समाज आणि सकल जैन समाज यांच्या वतीने नगरपालिका मुख्याधिकारी आणि ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींचे २२ जानेवारीला मांसविक्री आणि मद्यबंदीचे आदेश !

या आदेशात ‘२२ जानेवारीला गावात कोणत्याही प्रकारचे मांस, देशी, तसेच विदेशी मद्याची दुकाने, ढाबा संपूर्णत: बंद ठेवावा’, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रभु श्रीराम व्यक्ती नसून आदर्श, संस्कृती आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम ! – अश्विनीकुमार चौबे, केंद्रीय वनमंत्री

अयोध्येतील रामजन्मभूमीवर प्रभु श्रीराम विराजमान होत आहेत, हा क्षण देशवासियांसाठी दीपोत्सवच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान पालट राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी केले.

रामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त पुणे महानगर समितीच्या वतीने १३ लाख कुटुंबांशी संपर्क !

प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने पुणेकरांना अयोध्येतील रामललाच्या दर्शनाचे निमंत्रण देण्यासाठी न्यासाच्या वतीने एकूण ३५ सहस्र ३८२ रामसेवकांनी सहभाग घेतला. त्यात १० सहस्र १७८ महिलांचा सहभाग आहे.

११ महिने १४ राज्यांतून दंडवत घालत लेकाराम सैनी पोचले अयोध्येत !

२२ जानेवारी या दिवशी अयोध्या येथे श्रीरामजन्मभूमीत होणार्‍या श्रीरामामूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याला लेकाराम सैनी उपस्थित रहाणार आहेत.

Ayodhya Flowers Under Protection : श्रीराममंदिराच्या परिसरातील सजावटीच्या फुलांनाही दिवस-रात्र ‘कडेकोट संरक्षण !’

अयोध्यानगरीमध्ये २२ जानेवारी या दिवशी होत असलेल्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मंदिराचा संपूर्ण परिसर झेंडूच्या फुलांनी आकर्षकरित्या सजवण्यात आला आहे. मंदिराकडे जाणार्‍या मुख्य मार्गापासून ते मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत असलेल्या भिंतींवर झेंडूच्या फुलांच्या माळा लावण्यात आल्या आहेत.

दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी सरकारद्वारे चांगल्या सोयी-सुविधा ! – विनीत सिंह, भाजप आमदार, मिर्झापूर (उत्तरप्रदेश)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संत आहेत, तर आपले पंतप्रधान संन्यासी प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळे येथे येणार्‍या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. अशी माहिती येथील भाजपचे आमदार श्री. विनीत सिंह यांनी येथे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विशेष प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या सिद्धतेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून पहाणी !

अयोध्येतील भव्य श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्री रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा यांच्या चालू असलेल्या सिद्धतेची पहाणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १९ जानेवारी या दिवशी केली.

ठाणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांद्वारे ‘श्रीराम’ नामाचा जयघोष

रामकथा, पालखी मिरवणुका, रामायण महोत्सव, तसेच तलावाच्या परिसरात महाआरती, व्याख्यान, श्रीरामाच्या जीवनप्रवासावर आधारित ‘लेझर शो’ आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.

मुंबई आणि ठाणे येथील बाजारपेठा झाल्या भगवेमय !

लालबाग मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात ध्वज, टोप्या, रस्त्यांवर लावण्यात येणारे पट्टे यांची दुकाने आहेत. येथेही नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.