अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन !
अयोध्या, १९ जानेवारी (वार्ता.) – अयोध्या येथे संपूर्ण भारतातून मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा मंदिर विश्वस्त आणि सरकार यांच्या वतीने करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मिर्झापूर (उत्तरप्रदेश) येथील भाजपचे आमदार श्री. विनीत सिंह यांनी येथे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विशेष प्रतिनिधीशी बोलतांना दिली. अयोध्या येथे प्रभु श्रीरामाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर सिंह बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, अयोध्या नगरी त्रेतायुगात असल्याचे आज जाणवत आहे. येथे येणार्या सर्व भाविकांसाठी रहाणे आणि खाणे-पिणे यांच्या सर्व चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संत आहेत, तर आपले पंतप्रधान संन्यासी प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळे येथे येणार्या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. सर्व भक्त दर्शन आणि या सुंदर हर्षोल्हासाचा आनंदाने लाभ घेतील.