सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींचे २२ जानेवारीला मांसविक्री आणि मद्यबंदीचे आदेश !

कोल्हापूर – २२ जानेवारीला अयोध्या येथे श्रीराममूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा असून हा सोहळा गावांमधील अनेक मंदिरांमध्येही होत आहे. तरी या दिवशी गावात मांस, तसेच मद्यबंदी करण्याचे आदेश सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही ग्रामपंचायतींनी काढले आहेत. या आदेशात ‘२२ जानेवारीला गावात कोणत्याही प्रकारचे मांस, देशी, तसेच विदेशी मद्याची दुकाने, ढाबा संपूर्णत: बंद ठेवावा’, असे आवाहन करण्यात आले आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली, शिरोली पुलाची, उंचगाव, नेर्ली, तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील आरळा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अनेक ग्रामपंचायती असे आदेश काढत असून हा सोहळा अभूतपूर्व होण्यासाठी प्रत्येकजण त्यांच्या स्तरावर प्रयत्न करत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील नेर्ली ग्रामपंचायतीने काढलेला आदेश

कोल्हापूर जिल्ह्यातील उंचगाव ग्रामपंचायतीने काढलेला आदेश

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली-पुलाची ग्रामपंचायतीने काढलेला आदेश

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील आरळा ग्रामपंचायतीने काढलेला आदेश