निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याला अटक !

पिंपरी-चिंचवड येथे अमली पदार्थ सापडल्याचे प्रकरण

पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याला अटक

पिंपरी-चिंचवड : येथे ‘मेफेड्रोन’ हा अमली पदार्थ सापडल्याच्या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारा पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याला अटक करण्यात आली आहे. १ मार्चच्या पहाटे येथे २ कोटी रुपयांचे मेफेड्रोन सापडले होते. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी नमामी झा या हॉटेल कामगाराला अटक केली होती. पोलिसांकडून शेळके यांच्या अटकेची गुप्तता पाळण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आणखी ४३ किलो ‘मेफेड्रोन’ जप्त केले आहे. आतापर्यंत कह्यात घेतलेल्या अमली पदार्थाचे एकूण मूल्य ४५ कोटी इतकी आहे. या जाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संपादकीय भूमिका

अमली पदार्थ प्रकरणात पोलिसांचा सहभाग असणे म्हणजे पोलिसांनीच कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढल्यासारखे आहे ! अशा पोलिसांना बडतर्फ करून त्यांना आजन्म कारागृहात डांबायला हवे, असेच जनतेला वाटते !