४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या वासनांधाला ५ वर्षांचा सश्रम कारावास !

वासनांधाच्या कुकृत्याला पाठीशी घालणार्‍या त्याच्या मुलीलाही ८ महिन्याचा कारावास

वसई – शाळेच्या बसमध्ये ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने बसचालक आणि साहाय्यक महिला यांना दोषी ठरवले आहे. चालकाला ५ वर्षे सश्रम कारावास, तर साहाय्यक महिलेला ८ मास कारावासाची शिक्षा सुनावली आहे. डेनिस लुईस (वय ६३ वर्षे) हा चालक असून त्याची मुलगी जेनोविया मथाईस (वय ३२ वर्षे) ही साहाय्यक आहे. ही घटना वर्ष २०१९ मध्ये मिरा रोड येथे घडली होती.


डेनिसने लैंगिक अत्याचार केल्याने त्याला अटक करण्यात आली होती. सत्य ठाऊक असूनही मथाईस हिने ते लपवून त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता; पण काही दिवसांनी पोलिसांनी तिलाही अटक केली होती. आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावे न्यायालयात सादर केल्यावर वरील निर्णय देण्यात आला. ‘पीडित मुलीने न्यायालयात दिलेली साक्ष महत्त्वाची ठरल्याने आरोपींवरील आरोप सिद्ध होण्यास साहाय्य झाले’, असे पोलिसांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

वासनांधांच्या कुकृत्यांना त्यांचे नातेवाइक पाठीशी घालून एकप्रकारे अशा गुन्हेगारी कृत्यांची पाठराखण करतात. त्यामुळे अशांनाही कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे, असेच जनतेला वाटते !