नवी देहली – वर्ष २०१६ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते रुद्रेश यांच्या हत्येतील आरोपी महंमद घौस नियाझी याला दक्षिण आक्रिकेतून अटक करण्यात आली आहे. त्याला आता मुंबईत आणण्यात आले आहे. तो ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या बंदी घालण्यात आलेल्या जिहादी आतंकवादी संघटनेचा नेता आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) केलेल्या प्रयत्नांमुळे त्याला अटक करण्यात आली. एन्.आय.ए.ने घौस याची माहिती देणार्याला किंवा पकडून देणार्याला ५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले होते. बेंगळुरू येथे रुद्रेश यांच्या हत्येनंतर तो पसार झाला होता आणि वेगवेगळ्या देशात रहात होता.
रुद्रेश यांच्या हत्येच्या प्रकरणी यापूर्वी ४ जणांना अटक करण्यात आली आहे. यांतील मुख्य आरोपी ४० वर्षीय अझीम शरीफ याला पोलिसांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये अटक केली होती. हिंदूंमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली होती आणि हे आतंकवादी कृत्य होते.
संपादकीय भूमिकाहिंदु नेत्यांची हत्या करून जिहादी आतंकवादी देशातून बाहेर पळून कसे जातात ? सुरक्षायंत्रणा झोपलेल्या आहेत का ? |