डेहराडून (उत्तराखंड) येथे हनुमान चालिसाचे पठण करून परतणार्‍या तरुणांवर धर्मांधांचे आक्रमण

मोठ्या संख्येने धर्मांध तरुण दुचाकींवरून आले आणि हिंदु तरुणांच्या गळ्यातील भगवे उपरणे पकडून ‘तुम्ही बजरंग दलाचे सदस्य आहेत का ?’ अशी विचारणा करत त्यांना मारहाण केली.

पंजाबमध्ये ‘शिवसेना (बाळ ठाकरे)’ या संघटनेच्या खलिस्तानविरोधी मोर्च्यावर खलिस्तान समर्थकांचे आक्रमण

पंजाबमध्ये हिंदू ‘खलिस्तान’चा विरोध करतात, तर बहुसंख्य शीख शांत रहातात, तर खलिस्तानी समर्थक हे हिंदूंचा विरोध करतात, याचा अर्थ काय घ्यायचा ?

चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी कीर्तन बंद पाडले !

कीर्तन बंद पाडायला हा देश भारत आहे कि पाकिस्तान ? असा प्रकार करण्याचे धाडस पोलिसांनी अन्य धर्मियांच्या कार्यक्रमांच्या वेळी दाखवले असते का ?

अशांना कारागृहात टाका !

आम्ही २० टक्के आहोत, तर तुम्ही (हिंदू) ७० ते ८० टक्के आहात. त्यामुळे त्रास झाला, तर आमची २० घरे बंद होतील, तर तुमचीही ८० घरे बंद होतील, अशी धमकी झारखंडचे मंत्री हफीजुल अंसारी यांनी दिली आहे.

आगरा येथील राजा मंडी रेल्वे स्थानकावरील चामुंडादेवी मंदिर हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नोटीस

‘जर मंदिर हटवले नाही, तर हे फलाट प्रवाशांसाठी बंद करण्यात येईल’, असे प्रशासनाने म्हटले आहे.

झारखंडचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री हफीजुल हसन अंसारी यांची हिंदूंना धमकी !

आम्हाला त्रास दिला, तर तुम्ही ८० टक्के असल्याने तुम्हालाच अधिक त्रास होईल !

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयात कुलपतींनी इफ्तार पार्टीचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप !

हिंदूंमधील आत्मघातकी धर्मनिरपेक्षता एक दिवस त्यांना विनाशाच्या खाईत लोटणार, हे निश्‍चित !

ज्ञानवापी मशिदीच्या आतील सर्वेक्षण आणि चित्रीकरण होऊ देणार नाही !

न्यायालयाचा आदेश नाकारत ‘अंजुमन इंतजामिया मस्जिद कमेटी’ची चेतावणी !

महाराष्ट्राचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार श्री हनुमानाविषयी अश्लाघ्य वक्तव्य करत असलेला व्हिडिओ प्रसारित !

धर्मांध अब्दुल सत्तार यांना अटक करावी, तसेच त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने आंदोलन करावे !

अयोध्येतील तपस्वी छावणीचे जगद्गुरु परमहंसाचार्य यांना ताजमहालमध्ये जाण्यास रोखले !

हिंदूंच्या संतांचा असा अवमान केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणार्‍या सुरक्षा यंत्रणा कशा काय करतात ? त्यांना संतांचा योग्य मान राखण्याचे शिकवलेले नाही का ?