डॉनल्ड ट्रम्प यांची इराणला थेट धमकी

वॉशिंग्टन (अमेरिका) – हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास संपूर्ण इराण नष्ट केला जाईल, अशी उघड धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी दिली. तसेच इराणने हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेला लेबनॉनमधून तो करत असलेली आक्रमणे थांबवण्यास सांगावे, असेही सांगितले. स्वित्झर्लंडमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात चालू असलेल्या बैठकीच्या वेळी अमेरिकेची आक्रमक भूमिका पाहून इराणचे प्रतिनिधी बैठकीतून बाहेर पडले.
If the Strait of Hormuz is closed, the whole of Iran will be destroyed.
Donald Trump Issues a Direct Warning to Iran#StraitOfHormuz #lran #GlobalMarkets #EnergyCrisis#USIranPeaceTalk
PC: @dna pic.twitter.com/xMZBfJWekp— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 22, 2026
ट्रम्प यांच्याकडून शिवीगाळ
लेबनॉनवरील इस्रायली आक्रमणांच्या निषेधार्थ हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या इराणच्या चेतावणीला थेट उत्तर देतांना ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, या महत्त्वपूर्ण सागरी मार्गावरील कोणत्याही नाकेबंदीला ते प्रचंड शक्तीने चोख उत्तर देतील. तुम्ही तुमच्या स्वतःच्या देशात परत सुद्धा जाऊ शकणार नाही, असे म्हणत ट्रम्प यांनी दूरभाषवरून बैठकीत सहभागी होतांना शिवीगाळ केल्याचे म्हटले जात आहे.
इराणने करार केला नाही, तर आम्ही हॉर्मुझमधून टोल गोळा करू !
नंतर ट्रम्प यांनी दावा केला की, जर वाटाघाटी अपयशी ठरल्या, तर वॉशिंग्टन या सामुद्रधुनीवर थेट नियंत्रण मिळवू शकते. इराणने करार केला नाही, तर आम्ही तिथून टोल गोळा करू. अशा प्रणाली अंतर्गत हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणार्या नौकांकडून त्यांच्या एकूण तेल साठ्याच्या मूल्याच्या २० टक्के इतका टोल आकारला जाऊ शकतो.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan