नेपाळचे पंतप्रधान बालेन शहा यांचे जुन्या विधानावर स्पष्टीकरण

काठमांडू (नेपाळ) – भारतासमवेतचा सीमावाद सोडवण्यासाठी त्यांच्या देशाला ब्रिटनला मध्यस्थ बनवायचे नाही, असे स्पष्टीकरण नेपाळचे पंतप्रधान बालेन शहा यांनी दिले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सीमावादात ब्रिटनने मध्यस्थी करावी, असे आवाहन केले होते. आता ते म्हणाले की, माझ्या आधीच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला होता आणि नेपाळ हे सूत्र भारतासमवेत थेट चर्चेतूनच सोडवू इच्छितो.
🇳🇵 Nepal PM Balen Shah has clarified that his remarks were limited to examining British-era records on Kalapani and Lipulekh as historical evidence.
He also made it clear that he does not want Britain to mediate the border issue with India.
Nepal itself has unnecessarily… pic.twitter.com/CBwfTcJX8W
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 22, 2026
पंतप्रधान शहा एका कार्यक्रमात म्हणाले की, कालापाणी आणि लिपुलेख यांच्याशी संबंधित ब्रिटीश राजवटीतील काही कागदपत्रे उपलब्ध आहेत. हे ऐतिहासिक पुरावे समोर आणले पाहिजेत; परंतु याचा अर्थ असा नाही की, नेपाळला कोणत्याही तिसर्या पक्षाची मध्यस्थी हवी आहे. नेपाळ त्याच्या शेजारील देशांशी स्वतः चर्चा करेल आणि सीमावादावर तोडगा काढेल. भारतासमवेतची सर्व प्रलंबित सूत्रे द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवली जातील.
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले