हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी केली अटक

मैसुरू (कर्नाटक) – येथील रेल्वे स्थानकावर हावडा एक्सप्रेसने आलेल्या ४० हून अधिक बांगलादेशी घुसखोरांना रेल्वे आणि स्थानिक पोलीस यांनी कह्यात घेतले. स्थानकावरील त्यांच्या संशयास्पद हालचाली पाहून ‘हिंदु जागरण वेदिके’च्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कोलकात्यातून प्रत्येक आठवड्याला येथे येणार्या हावडा एक्सप्रेसमधून हे सर्वजण एकत्रितपणे मैसुरूत उतरले होते. बहुतेकांकडे बंगालचा पत्ता असलेले आधारकार्ड आणि इतर कागदपत्रे असली, तरी त्यांपैकी बहुतेक कागदपत्रे बनावट असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
🚨 Infiltration Network Exposed? 40 Bangladeshi Nationals Detained in Mysuru
40 suspected Bangladeshi infiltrators were apprehended at Mysuru Railway Station after arriving on the Howrah Express, thanks to the alertness of Hindu Jagran Vedike activists.
❓How extensive is this… pic.twitter.com/Crlv2uwQx1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 22, 2026
पोलिसांनी कसून चौकशी केली असता प्रत्येकाने वेगवेगळी आणि गोंधळलेली विधाने केली. काहींनी मैसुरूच्या जवळच्या भागात मजुरीच्या कामासाठी आल्याचे सांगितले, तर काहींनी स्वतःला पर्यटक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तपासानुसार हे सर्वजण मैसुरूहून कोडगू जिल्हा आणि शेजारील केरळ राज्याच्या विविध भागांत जाऊन कॉफीच्या बागा अन् इतर कारखाने येथे बेकायदेशीरपणे काम मिळवण्याच्या मोठ्या योजनेने आले होते.
बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यापासून घुसखोर इतर राज्यांत स्थलांतरित होत आहेत ! – एल्. नागेंद्र, माजी आमदार, भाजप
या संदर्भात माजी आमदार एल्. नागेंद्र म्हणाले की, प्रत्येक रविवारी बंगालमधून बांगलादेशी घुसखोर मैसुरूला येत आहेत. बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर घुसखोर इतर राज्यांमध्ये स्थलांतरित होत आहेत. सरकारने यांच्यावर करडी दृष्टी ठेवली पाहिजे. गृहमंत्री प्रियांक खर्गे संघाच्या सूत्राखेरीज दुसरे काहीच करत नाहीत. उद्या राज्यात दंगल झाली, तर त्यास राज्य सरकार थेट उत्तरदायी असेल. ताबडतोब घुसखोरांना रोखण्यासाठी कारवाई करा.
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक