श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, सनातन प्रभात मुंबई
मुंबई, २२ जून (वार्ता.) – वर्ष २०२४ पासून आजपर्यंत म्हणजे मागील अडीच वर्षांत महाराष्ट्रातून ३ सहस्र ५४१ बांगलादेशी घुसखोरांना बांगलादेशात परत पाठवण्यात आले. ही महत्त्वाची माहिती गृहराज्यमंत्री (शहर) योगेश कदम यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली. या कारवाईमध्ये वर्ष २०२४ मध्ये २०२, वर्ष २०२५ मध्ये २ सहस्र ७३६, तर मे २०२६ पर्यंत ६०३ बांगलादेशी घुसखोरांची बांगलादेशात हकालपट्टी करण्यात आली. काही घुसखोरांविषयी न्यायालयीन प्रक्रिया चालू असल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.

शासकीय योजनांतील घुसखोराचा शोध घेण्याच्या विलंबाविषयी माहिती मागवली !
आतंकवादविरोधी पथकाने बांगलादेशी घुसखोरांच्या नावांची सूची सरकारकडे पाठवली आहे. या आधारे सरकारच्या विविध खात्यांतील योजनांचा लाभ बांगलादेशी घुसखोर घेत आहेत का ?, याचा शोध चालू आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पुरवठादारांनाही ही सूची पाठवण्यात आली आहे. ही सूची पाठवून १ वर्ष होऊनही अद्याप एकाही जिल्ह्यातून याविषयीचा आढावा सरकारकडे आलेला नाही. याविषयी विचारले असता या प्रकरणी माहिती मागण्याची सूचना राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !