बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांची घोषणा
कोलकाता (बंगाल) – शुभेंदु अधिकारी यांच्या सरकारने कोलकात्यातील ‘सुर्हावर्दी एव्हेन्यू’ रस्त्याचे नामांतर करून ते गोपाल मुखर्जी उपाख्य गोपाल पाठा असे ठेवले आहे. सुर्हावर्दी फाळणीच्या वेळी ‘मुस्लिम लीग’चा प्रमुख नेता आणि बंगालचा मुख्यमंत्री होता. त्यानेच ‘डायरेक्ट ॲक्शन’ या लीगच्या हिंसक आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यात सहस्रावधी हिंदूंची हत्या आणि हिंदु महिलांवर बलात्कार करण्यात आले होते. यावरून त्याला ‘बंगालचा कसाई’ असे म्हटले जात होते.
CM Suvendu Adhikari: Time to Honour Bengal's Real Hero, Gopal Patha!
Kolkata’s Suhrawardy Avenue is set to be renamed as
Gopal Mukherjee Road after Gopal Patha – remembered for defending thousands of Hindus during the 1946 Calcutta killings.The road was named after H.S.… pic.twitter.com/8odE84C000
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 22, 2026
आता वेळ आली आहे की, बंगालने खर्या नायकांना स्मरणात ठेवावे ! – मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी
मुख्यमंत्री अधिकारी म्हणाले की, अनेक दशकांपासून आपल्या शहराच्या एका मुख्य रस्त्याचे नाव अशा व्यक्तीच्या नावावर होते, ज्याने केवळ राजकीय लाभासाठी राज्याच्या सत्तेचा शस्त्र म्हणून चुकीचा वापर केला आणि निष्पाप नागरिकांच्या नरसंहाराचा कट रचला. आता याचे नाव पालटून गोपाल मुखर्जी यांच्या नावावर ठेवले जात आहे. ते एक निर्भीड व्यक्ती होते, ज्यांनी सहस्रो निष्पाप लोकांचे प्राण वाचवण्यासाठी मुख्य रक्षक म्हणून पाऊल पुढे टाकले होते. अशा प्रकारे एका खर्या रक्षकाचा आणि वाचवणार्याचा सन्मान करून ऐतिहासिक न्याय पुनर्संचयित केला जाईल. आता वेळ आली आहे की, बंगालने खर्या नायकांना स्मरणात ठेवावे, चुका सुधाराव्यात आणि त्यांचा सन्मान करावा.

हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !