श्रीराममंदिरात दानाची चोरी झाल्याचे प्रकरण

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिरातील दानाची मोजणी करणार्या सर्व कर्मचार्यांना हटवण्यात आले आहे. अनुमाने ३५ ते ४० लोक दानाच्या रक्कमेची मोजणी करण्यात गुंतले होते. बहुतेकांची भूमिका संशयास्पद असल्याने या सर्वांना हटवण्यात आले आहे. बँकेने नवीन कर्मचारी तैनात केले आहेत. आता कडक देखरेखीखाली दानाची मोजणी केली जात आहे.
अयोध्या येथील ‘केवळ ट्रस्ट’ व्यवस्था पालटून पारंपरिक ‘साधू-केंद्रित’ व्यवस्थेमध्ये रूपांतरित व्हावी ! – महंत धर्मदास बाबा

श्रीराममंदिर देणगीतील कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणावर रामललाचे माजी पक्षकार आणि हनुमानगढी मंदिराचे महंत धर्मदास बाबा म्हणाले की, ज्यांनी हे घृणास्पद कृत्य केले आहे, त्यांच्यासाठी कुठलीही शिक्षा अल्पच आहे. संपूर्ण देशाने या कृत्याचा निषेध केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री योगी यांनी विशेष अन्वेषण पथकाची स्थापना केली आहे. ते या प्रकरणात जराही निष्काळजीपणा खपवून घेणार नाहीत. अयोध्या येथील व्यवस्था या ‘केवळ ट्रस्ट’ असलेल्या मॉडेलवरून पालटून पारंपरिक ‘साधू-केंद्रित’ व्यवस्थेमध्ये रूपांतरित व्हावी, अशी इच्छा महंत धर्मदास बाबा यांनी व्यक्त केली आहे.
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
पुणे शहरात वारीमध्ये ८ सहस्रांहून अधिक पोलीस कर्मचारी असतांना चोरीच्या ११ घटनांची नोंद !
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक