
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने एकाच वेळी ९ लाख स्थलांतरितांचे कायदेशीर परवाने रहित करून त्यांना तात्काळ अमेरिका सोडण्यास सांगितले आहे.‘सीबीपी वन ॲप’ धोरणाअंतर्गत हे स्थलांतरित अमेरिकेत आले होते. ट्रम्प प्रशासनाने हे धोरण उलट केले आहे आणि या स्थलांतरितांचे कायदेशीर परवाने रहित केले आहेत. यामध्ये भारतियांच्या सहभागाविषयी अद्याप कोणतीही माहिती नाही.
जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२४ पर्यंत सीबीपी वन ॲप वापरून ९ लाख ३६ सहस्र ५०० लोकांनी मॅक्सिकोच्या सीमेवरून अमेरिकेत प्रवेश केला. त्यांना पॅरोल नावाच्या राष्ट्रपती अधिकाराखाली काम करण्याचा अधिकार देऊन २ वर्षे अमेरिकेत रहाण्याची अनुमती होती. ट्रम्प प्रशासनाच्या गृह सुरक्षा विभागाने म्हटले आहे की, अमेरिकी लोक आणि देशाची सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी हे पॅरोल आता रहित करण्यात आले आहेत.
सीबीपी वन ॲपद्वारे अमेरिकेत प्रवेश केलेल्या लोकांना परवाने रहित केल्याविषयी ईमेलद्वारे सूचित केले जात आहे.
संपादकीय भूमिकाभारतात घुसखोरांनाच हाकलले जात नाही, तेथे स्थलांतरितांना कोण बाहेर पाठवणार ?‘ सरकार आता तरी अमेरिकेप्रमाणे कठोर पाऊले उचलणार का ? |