अन्नधान्याच्या संकटामुळे चीन अनेक वर्षांनंतर भारताकडून तांदूळ खरेदी करणार

चीनने विज्ञानामध्ये कितीही प्रगती केली, शेजारी देशांवर अतिक्रमण केले, तरी पोटाची भूक भागवण्यासाठी त्याचा वापर होऊ शकत नाही, हे आता त्याच्या लक्षात येईल, हीच अपेक्षा !

नवी देहली – अन्नधान्य पुरवठा अल्प झाल्यानंतर आणि भारताकडून मूल्यामध्ये सूट दिल्यानंतर चीन भारताकडून धान्य खरेदी करत आहे. ३ दशकांत चीनने प्रथमच भारताकडून तांदळाची आयात करण्यास प्रारंभ केला आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे, तर चीन सर्वांत मोठा आयातदार आहे.

चीन प्रतिवर्षी अनुमाने ४० लाख टन तांदूळ आयात करतो; मात्र गुणवत्तेचे कारण देत तो भारतकडून तांदूळ खरेदी करणे टाळत होता. त्यातही सीमावादाच्या पार्श्‍वभूमीवर चीनने भारताकडून तांदूळ खरेदी करण्याचा हा निर्णय घेतला आहे. उद्योग अधिकार्‍यांनी सांगितले की, भारतीय व्यापार्‍यांनी चीनसमवेत डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत १ लाख टन तांदूळ प्रतिटन ३ सहस्र रुपयांंच्या दराने निर्यात करण्याचा करार केला आहे.