आसाम सरकार ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कायदा करत आहे ! – अर्थमंत्री हिमंत बिस्वा सरमा

  • प्रत्येक राज्याने असा कायदा करत बसण्यापेक्षा केंद्रातील भाजप सरकारने संपूर्ण देशासाठी लव्ह जिहादविरोधी कायदा बनवावा, असेच हिंदूंना वाटते !
  • लव्ह जिहादविरोधी कायदा करून थांबू नये, तर मुळात हिंदु महिला आणि युवती यांना धर्मशिक्षण देऊन, त्यांच्यावर साधनेचा संस्कार करून त्यांना सात्त्विक बनवण्यात आले, तर त्या लव्ह जिहादच्या षड्यंत्राला बळी पडणार नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे.
हिमंत बिस्वा सरमा

गौहत्ती (आसाम) – आसाममध्येही लव्ह जिहादविरोधी कायदा बनवण्यात येत आहे. या अंतर्गत विवाहापूर्वी १ मास विवाह करणार्‍या जोडप्यांना कागदपत्रांसह स्वतःचा धर्म आणि उत्पन्न यांविषयी माहिती सरकारला द्यावी लागणार आहे.


राज्याचे अर्थमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी म्हटले की, महिलांचे सशक्तीकरण करण्याच्या उद्देशाने हा कायदा केला जाणार आहे. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांत बनवण्यात आलेल्या लव्ह जिहादविरोधी कायद्याप्रमाणे हा कायदा नसेल; मात्र काही समानता असणार आहे. हा सर्व धर्मांसाठी समावेशी असा कायदा असणार आहे.