अशा गंभीर गुन्ह्यांच्या संदर्भात सरकार काही कृती करील, याची निश्‍चिती नसल्याने आता जनतेला पुढाकार घ्यावा लागेल !

‘पाळधी (जिल्हा जळगाव) येथील ग्रामपंचायत कार्यालयात कोणतीही पूर्वानुमती नसतांना टिपू सुलतानची प्रतिमा लावण्यात आली. गावातील वाढता विरोध पहाता ही प्रतिमा कार्यालयातून काढण्यात आली होती; मात्र धर्मांधांनी पुन्हा आक्रमकपणे ग्रामपंचायत कार्यालयात येऊन ग्रामसेवक पाठक यांना धमक्या देत त्यांच्याशी वाद घातला. पोलिसांना माहिती मिळताच तेथे पोलीस उपनिरीक्षक गायकवाड आणि हवालदार पोचले. तरीही पोलिसांनी या प्रतिमेवर कागद लावून ती पुन्हा कार्यालयात लावून घेतली.’