कोल्हापूर जिल्ह्यात ४०० शाळा चालू, तर ६५४ शाळा अद्यापही बंदच !

विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी भरून निघण्यासाठी शाळा लवकर चालू होणे अपेक्षित असतांना प्रशासनाने अशा प्रकारे ढिलाई करणे लज्जास्पद आहे.

मराठी भाषा आणि संस्कृती यांचा आदर केल्यास अमराठींना आमचा विरोध होणार नाही ! – नितीन सरदेसाई, मनसे

अमराठी लोकांचा आम्ही द्वेष करतो, ही चुकीची समजूत आहे.=मनसेचे नेते नितीन सरदेसाई

कृषी कायद्याच्या माध्यमातून देशात अराजक निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

विरोधाला विरोध म्हणून विरोधक कृषी कायद्याला विरोध करत आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे योग्य नियोजन करा ! – पालकमंत्री उदय सामंत

कोरोना विषाणूचा संसर्ग अल्प होत आहे, तरीही कोरोनाला पूर्ण प्रतिबंध करण्यासाठी शासनाकडून नजिकच्या काळात कोरोनावरील लस देण्यात येणार आहे. हे लसीकरण करण्याविषयी सूक्ष्म आणि योग्य नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

सिलीगुडी (बंगाल) येथे पोलिसांच्या लाठीमारात भाजपच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू !

बंगालमध्ये पोलीस कधी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करतात का ? आणि केला, तर त्यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू होतो का ?

सुरूंग स्फोटांमुळे हानी झालेल्यांना हानीभरपाई मिळावी अन्यथा आंदोलन करू ! – निगुडे ग्रामस्थांची चेतावणी

खनिजांच्या अतीउत्खननामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन संबंधित उपाययोजना प्रशासनाने स्वतःहून करायला हव्या होत्या ! प्रत्येक गोष्टीसाठी जनतेला आंदोलन का करावे लागते ?

वाळू तस्करीवर नियंत्रण कधी ?

अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या पथकावर वाळू तस्करांकडून सशस्त्र आक्रमण केले जाते. त्यांच्याकडे शस्त्रे कुठून येतात ? महसूल विभागाचे पथक कारवाईसाठी येणार असल्याची माहिती या मंडळींना कशी मिळते ? तसेच कायदा-सुव्यवस्था मोडीत काढण्याचे धाडस या लोकांकडे कुठून येते ?

देहलीमधील एका नाल्यातून मोठ्या प्रमाणात गायींचे अवशेष सापडले

अशा प्रकारच्या घटना घडतात, हे पोलीस आणि शासनयंत्रणा यांना लज्जास्पद ! गोहत्या करणार्‍यांना तात्काळ शिक्षा होण्यासाठी देशात त्यांच्यासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करून तेथे जलद गतीने खटले चालवणे आवश्यक आहे !

राहुल गांधी यांना समजून घेण्यास शरद पवार न्यून पडले ! – बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

राहुल गांधी यांना पक्षात स्वीकारार्हता असून त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील काँग्रेस पुन्हा संघटित होत आहे.=बाळासाहेब थोरात

टॉप्स सिक्युरिटी’ आस्थापनाचे माजी उपाध्यक्ष रमेश अय्यर यांच्यावर मुंबई पोलिसांकडून गुन्हा नोंद

महाराष्ट्र शासन आणि केंद्रशासन यांच्यातील कुरघोडीचे राजकारण दिसून येत आहे.