सिलीगुडी (बंगाल) येथे पोलिसांच्या लाठीमारात भाजपच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू !

बंगालमध्ये पोलीस कधी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करतात का ? आणि केला, तर त्यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू होतो का ?

सिलीगुडी (बंगाल) – तीनबत्ती येथे भाजपकडून करण्यात आलेल्या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात भाजपचे कार्यकर्ते उलेन रॉय हे घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्यावर त्यांचा मृत्यू झाला.

भाजपने या प्रकरणी पोलिसांना उत्तरदायी ठरवले आहे, तर पोलिसांचे म्हणणे आहे की, ‘भाजपच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आल्याने त्यांना लाठीमार करावा लागला.’ (जर बंगाल पोलिसांनी शांतीपूर्ण समाजावर अशा प्रकारे लाठीमार केला असता आणि या समाजाने पोलिसांवर जर अशा प्रकारे आरोप केला असता, तर पोलीस अशा प्रकारे प्रत्युत्तर देण्यास धजावले तरी असते का ? – संपादक)

या आंदोलनामध्ये भाजपचे बंगाल राज्य प्रभारी कैलास विजयवर्गीय, भाजप युवा मोर्च्याचे अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या आदी नेते सहभागी झाले होते. या मृत्यूमुळे भाजपने ८ डिसेंबरला येथे बंदचे आवाहन केले होते.