देहलीमधील एका नाल्यातून मोठ्या प्रमाणात गायींचे अवशेष सापडले

अनेक मासांपासून गोहत्या करून अवशेष नाल्यात टाकण्यात येत असल्याचा संशय

देशातील अनेक राज्यांत गोहत्या बंदी कायदा असतांना अशा प्रकारच्या घटना घडतात, हे पोलीस आणि शासनयंत्रणा यांना लज्जास्पद ! गोहत्या करणार्‍यांना तात्काळ शिक्षा होण्यासाठी देशात त्यांच्यासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करून तेथे जलद गतीने खटले चालवणे आवश्यक आहे !

देहली – येथील द्वारका सेक्टर-२३ च्या पोचनपूर गावामधील एका नाल्यातून मोठ्या प्रमाणात गायींचे अवशेष सापडले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. तसेच या प्रकरणी निष्काळजीपणा केल्यावरून दोघा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर भाजपचे स्थानिक खासदार परवेश साहिब सिंह घटनास्थळी पोचले आणि त्यांनी याची माहिती घेतली.

(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तुस्थिती कळावी, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक)

तसेच आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. त्यांच्या मते गोहत्या करून अवशेष तेथे टाकण्यात येत होते आणि त्यांनी हे अनेक मासांपासून चालू असल्याची शक्यताही वर्तवली. तसेच त्यांनी अशा घटना होऊ नयेत; म्हणून येथे सीसीटीव्ही लावण्याचीही मागणी केली आहे.