कराड, ७ मार्च (वार्ता.) – जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या संचारबंदीचा नियम भंग करणार्या २२ जणांवर कराड पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.
याविषयी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर्. पाटील म्हणाले की, कराड शहरातील मंगळवार पेठेतील श्री जोतिबा मंदिरासमोर दोन गटांत शाब्दीक चकमक झाली. त्यामुळे घटनास्थळी गर्दी जमा होऊन धक्काबुक्की झाली. संचारबंदी असतांना घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती घेत आम्ही गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला; मात्र गर्दी हटेना. तेव्हा आम्हाला बळाचा उपयोग करावा लागला. या प्रकरणी २० ते २२ लोकांवर संचारबंदी भंग केल्याविषयी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कारवाई केली आहे.