वाढत्या चोरीच्या घटना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात !
सातारा, ६ मार्च (वार्ता.) – वाई तालुक्यातील बावधन येथील आणि फलटण तालुक्यातील आदर्की बुद्रुक येथे घरे फोडून दरोडेखोरांनी घरातील साहित्य लुटून नेले. घरफोड्यांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाई तालुक्यातील बावधन येथे ४ जणांच्या टोळीने घरात प्रवेश करत लहान मुलाला मारहाण केली. लोखंडी कपाट उघडून चोरी करत असतांना मुलाने आरडा-ओरडा केल्याने चोरांनी हाताला लागेल तेवढे साहित्य घेऊन पळ काढला. ही घटना सकाळी १० वाजता घडली. (दिवसाढवळ्या चोर्या होणे हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक)
फलटण तालुक्यातील आदर्की बुद्रुक येथील सौ. राजकुवर नलावडे यांच्या निवासस्थानातील खोलीचे दार कटावणीच्या साहाय्याने तोडून २ मार्चच्या मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने आणि रोख ५६ सहस्र रुपये असा २ लाख ७ सहस्र रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.