महापालिकेच्या आरोग्य केंद्रात महिलादिनी केवळ महिलांचे लसीकरण ! – नितीन कापडणीस, आयुक्त, सांगली महापालिका

सांगली, ७ मार्च (वार्ता.) – जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आणि शासनाच्या निर्देशानुसार ८ मार्च या दिवशी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या २ आरोग्य केंद्रात केवळ महिलांसाठी कोरोना लसीकरण केले जाणार आहे, अशी माहिती सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

आयुक्त पुढे म्हणाले, सांगलीच्या जामवाडी आणि मिरज शहरातील मिरज अर्बन या २ आरोग्य केंद्रात हे लसीकरण केले जाणार आहे. यात महिला आरोग्य कर्मचारी, महिला फ्रंटलाईन वर्कर, जेष्ठ महिला नागरिक यांना हे लसीकरण केले जाणार आहे.