आयुक्त कार्यालयातील अधिकार्‍यांकडून झालेल्या अक्षम्य चुकांमुळे परमवीर सिंह यांचे स्थानांतर ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

मुंबई पोलीस प्रमुख म्हणून त्यांच्या कार्यालयातून त्यांच्या सहकार्‍यांकडून अक्षम्य चुका झाल्या. त्या क्षमा करण्यासारख्या नाहीत. अन्वेषणात अडथळा येऊ नये, यासाठी परमवीर सिंह यांच्या स्थानांतराचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

केरळमधील कोडुंगल्लूर येथील भद्रकाली मंदिरात आयोजित उत्सवात धार्मिक विधी करण्यावर प्रशासनाकडून बंदी !

केरळमधील साम्यवादी सरकारच्या काळात हिंदूंच्या धार्मिक विधींवर बंदी घातली जाणे हा हिंदुद्वेषच होय ! अन्य धर्मियांच्या एखाद्या धार्मिक कृतीवर बंदी घालण्याचे धाडस साम्यवादी सरकार दाखवेल का ?

कर्नाटक वक्फ बोर्डाकडून मशिदींना ध्वनीक्षेपक न लावण्याविषयी दिलेला आदेश मागे !

भोंग्यांवरून दिल्या जाणार्‍या अजानमुळे लोकांना होणारा त्रास सर्वश्रुत आहे आणि ते धर्मांधांनाही ठाऊक आहे; मात्र ते पोलीस, प्रशासन एवढेच काय, तर सर्वोच्च न्यायालयालाही जुमानत नाहीत

मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे नवे आयुक्त

मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

थकीत वीजदेयके टप्प्याटप्प्याने भरण्यास सवलत द्यावी, अन्यथा संघर्ष अटळ ! – उदयनराजे भोसले

थकबाकीमुळे वीजजोडणी तोडण्याची कारवाई होणार असेल, तर ते कदापि सहन केले जाणार नाही. अशा वेळी आम्ही ग्राहकांच्या बाजूने ठामपणे उभे राहू,असेही ते पुढे म्हणाले

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी केवळ १ सहस्र ५०० भाविकांना दिला जाणार प्रवेश !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने केवळ १ सहस्र ५०० भाविकांनाच दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

जगभरातील सर्वाधिक प्रदूषित ३० शहरांपैकी २२ शहरे भारतात !

देशातील सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी हे रोखण्यासाठी आतापर्यंत काहीच न केल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. देशातील सर्व प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे !

सद्दाम हुसेन आणि गद्दाफी हेही निवडणुका जिंकत होते; पण तेथे लोकशाही होती, असे नाही ! – राहुल गांधी यांची केंद्रातील भाजप सरकारवर टीका

विदेशी विश्‍वविद्यालयाने ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘भारतात लोकशाही नाही’, असे चित्र उभे करून भारताची मानहानी करणारे राहुल गांधी !

अलाहाबाद केंद्रीय विद्यापिठाच्या कुलगुरूंकडून अजानच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार !

याविषयी सर्वसामान्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे पोलीस निदान कुलगुरूंच्या तक्रारीकडे तरी लक्ष देतील, अशी अपेक्षा ! उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना जनतेला अजानमुळे त्रास होऊ नये, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

(म्हणे) ‘इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळांना अनुदान न मिळाल्यास या शाळांतील पालक आणि विद्यार्थी ते सहन करणार नाहीत !’ – ‘फोर्स’ संघटना

भावी पिढीची अधोगती करणार्‍या इंग्रजाळलेल्या पालकांच्या ताकदीला भीक घालायची का ?  ते सरकारने ठरवावे !