|
प्रयागराज (उत्तर प्रदेश) – येथील अलहाबाद केंद्रीय विद्यापिठाच्या कुलगुरु प्रा. संगीता श्रीवास्तव यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून पहाटे देण्यात येणार्या अजानमुळे झोपमोड होत आहे, अशी तक्रार जिल्हाधिकारी भानूचंद्र गोस्वामी यांना पत्र लिहून केली आहे. यामध्ये प्रा. श्रीवास्तव यांनी नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. श्रीवास्तव यांनी या पत्राची प्रत पोलीस आयुक्त, पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस महासंचालक यांनाही पाठवली आहे. श्रीवास्तव यांच्याकडून काही दिवसांपूर्वी पत्र मिळाल्याची माहिती पोलीस महासंचालक सर्वश्रेष्ठ त्रिपाठी यांनी दिली आहे. त्यांनी या विषयावर अधिकार्यांना चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. त्याचसमवेत जिल्हाधिकारी भानूचंद्र गोस्वामी यांनीदेखील या विषयावर नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. काही वर्षांपूर्वी गायक सोनू निगम यांनीही मशिदीवरील भोंग्यांवरून पहाटे देण्यात येणार्या अजानमुळे झोपमोड होते, अशी तक्रार सामाजिक माध्यमांतून केली होती.
‘अजान से रोज नींद में पड़ती है खलल, कामकाज होता है प्रभावित’: इलाहाबाद विवि की VC ने DM से की त्वरित कार्रवाई की अपील#UttarPradeshhttps://t.co/AB2wYY4IBK
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 17, 2021
प्रा. श्रीवास्तव यांनी या पत्रामध्ये लिहिले आहे की,
१. प्रतिदिन पहाटे ५.३० वाजता अजान होते. (सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी ६ पूर्वी ध्वनीक्षेपक लावण्यास बंदी असतांना ५.३० वाजता भोंग्यांवरून अजान कशी काय होते आणि स्थानिक पोलीस बहिरे आहेत का कि यांच्या हे लक्षात येत नाही ? कि त्याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत ? याचाही शोध घेतला पाहिजे ! – संपादक) भोंग्यांवरून होणार्या अजानमुळे झोपमोड होते. त्यानंतर अनेक प्रयत्न करूनही झोप येत नाही. त्यामुळे दिवसभर डोकेदुखीचा त्रास होतो. याचा परिणाम प्रतिदिनच्या कामकाजावरही होत आहे.
प्रा. श्रीवास्तव यांनी लिहिलेले पत्र वाचण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा –
२. मी कोणताही संप्रदाय किंवा जात यांच्या विरोधात नाही. तुम्ही अजान भोंग्याविनाही करू शकता. त्यामुळे दुसर्यांची दिनचर्या प्रभावित होणार नाही.
३. आगामी ईदपूर्वी ‘सहरी’ची (रमजानच्या काळात पहाटे करायचे भोजन) घोषणा पहाटे ४ पूर्वी होईल. त्यामुळे त्यांच्या आणि इतरांच्या त्रासामध्ये भर पडेल. भारतीय राज्यघटनेत सर्व पंथनिरपेक्ष आणि शांततापूर्ण सौहार्दाची संकल्पना मांडण्यात आली आहे.