Pu. Asaramji Bapu Gets Bail : संतश्री पू. आसारामजी बापू यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन संमत

सध्या ते जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात अन्य एका बलात्कारच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. दुसर्‍या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्याने कारागृहातून बाहेर येणे अशक्य

माझे वक्तव्य साईभक्तांच्या संदर्भात नसून ते येथे वाढलेल्या गुन्हेगारीच्या संदर्भात ! – डॉ. सुजय विखे-पाटील

शिर्डीतील प्रसादालयात विनामूल्य भोजन करणार्‍यांच्या संदर्भात मी जे वक्तव्य केले, त्यात काहीही चूक नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. शिर्डी येथे येणार्‍या भक्तांमध्ये आम्ही ‘साईबाबा’च पहातो. साईभक्तांविषयी आमच्या मनात काही नाही.

Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळा : शौचालये, विद्युतीकरण, वाळू सपाटीकरण आदी कामे अद्यापही अपूर्ण !

महाकुंभस्थळी विविध आखाड्यांचे साधू आणि लाखो भाविक आले आहेत; मात्र येथील शौचालये, पाणी व्यवस्था, विद्युतीकरण, वाळूचे सपाटीकरण ही महत्त्वाची कामे अद्यापही प्रलंबित आहेत. १३ जानेवारीपासून महाकुंभाला प्रारंभ होणार आहे.

HMPV Virus In India : देशात एच्.एम्.पी.व्ही.चे एकूण ८ रुग्ण

देशात ‘ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस’चे (एच्.एम्.पी.व्ही.चे) आतापर्यंत ८ रुग्ण आढळून आले आहेत. नागपूर येथे २ रुग्ण आढळले आहेत. यात १३ वर्षांची मुलगी आणि ७ वर्षांचा मुलगा यांचा समावेश आहे. दोघांनाही रुग्णालयात प्रविष्ट (दाखल) करावे लागले नसले, तरी घरी उपचार घेऊन त्यांची प्रकृती नियंत्रणात आहे.

Nepal Earthquake : नेपाळमध्ये ७.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप : ९५ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये ७ जानेवारीला सकाळी ७.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामध्ये ९५ जणांचा मृत्यू झाला, तर ६२ जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे. यापूर्वी नेपाळमध्ये एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामध्ये अनुमाने १० सहस्र लोक मृत्यूमुखी पडले होते.

Mecca Medina Underwater : जेद्दा, मक्का आणि मदिना येथे पूरसदृश स्थिती !

जेद्दा, मक्का आणि मदिना या शहरांमध्ये ६ जानेवारीला जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. पावसामुळे अनेक भागांत पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि रस्ते बंद करावे लागले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागले.

Anita Anand and George Chahal : भारतीय वंशाच्या अनिता आनंद आणि जॉर्ज चहल यांचे नाव पंतप्रधानपदाच्या चर्चेत !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पंतप्रधानपदाचे त्यागपत्र दिल्यानंतर लिबरल पक्षाच्या अध्यक्षांना नवीन नेता आणि पंतप्रधानपदासाठी व्यक्ती निवडण्यास चालू केले आहे. सध्या तरी नवीन नेता निवडेपर्यंत ट्रुडो पंतप्रधानपदावर रहाणार आहेत.

Suhas Subramanyam : खासदार सुहास सुब्रह्मण्यम् यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली शपथ

अमेरिकेतील भारतीय वंशाचे नवनिर्वाचित खासदार सुहास सुब्रह्मण्यम् यांच्यासह आणि पाच जणांनी अमेरिकी संसदेच्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’ या कनिष्ठ सभागृहामध्ये शपथ घेतली. भारतीय वंशाच्या ६ खासदारांनी एकत्र शपथ घेण्याची ही पहिलीच वेळ !

Pannu Threatens MahaKumbh Again : अमेरिकापुरस्कृत खलिस्तानी आतंकवादी पन्नू याची महाकुंभाला पुन्हा एकदा धमकी !

‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’, तसे पन्नूसारख्यांच्या धमक्यांमुळे महाकुंभावर कोणतेही संकट येऊ शकणार नाही ! पन्नूच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने अमेरिकेवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : विमानतळावर अवैध औषधे आणि सिगारेट जप्त !; कल्याण-डोंबिवली येथे अतीवेगाने दुचाकी चालवणार्‍यांवर कारवाई !…

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लंडनला बेकायदेशीररित्या पाठवल्या जाणार्‍या ७४ सहस्र औषधांच्या गोळ्या (२९.६ किलोग्रॅम) आणि २ लाख ४४ सहस्र ४०० बनावट सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत.