कठीण परिस्थितीत स्थिर राहून मुलींना साधनेत साहाय्य करणार्या कोची, केरळ येथील श्रीमती नीता सुखटणकर (वय ७५ वर्षे) !
‘माझी आई श्रीमती नीता सुखटणकर (वय ७५ वर्षे) हिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. तिला अनेक वर्षे पुष्कळ मानसिक संघर्ष सहन करावा लागला. देव आणि गुरु यांच्यावर असलेल्या तिच्या श्रद्धेमुळे ती कठीण प्रसंगांना सामोरे गेली. तिने कष्टमय जीवनाचा कधीही कंटाळा केला नाही.