महाराष्ट्रात मागील निवडणुकीत ४ लाख ७७ सहस्र मतदारांनी वापरला होता नोटाचा पर्याय !

वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांतील एकूण ४ लाख ७७ सहस्र २८९ मतदारांनी ‘नोटा’ (निवडणुकीला उभे राहिलेल्या सर्व उमेदवारांना नाकारत असल्याचा मतदारांसाठी असलेला पर्याय) हा पर्याय वापरला होता.

Bengaluru Shopkeeper Assault Case : हनुमान चालिसा लावल्यावरून दुकानदाराला मारहाण करणारे सर्व आरोपी अटकेत !

पोलिसांनी गुन्हा नोंदवतांना हनुमान चालिसाचा उल्लेख वगळला !

मुंबई विमानतळावर २ विदेशी महिला तस्करांसह नायजेरियन तस्कर अटकेत !

भारतातील अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे नष्ट करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या संशयित आरोपीचे ५ मजली बेकायदेशी घर तोडा ! – मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री

हिंदूच्या तक्रारींना केराची टोपली दाखवणार्‍या पोलिसांना बडतर्फच करायला हवे !

भारतविरोधी भूमिका घेणार्‍या कॅनडावर आर्थिक मंदीचे सावट !

मालदीवने भारतविरोधी भूमिका घेतली आणि त्यानंतर त्याची परिस्थिती बिकट झाली. मालदीवनंतर आता भारताला विरोध करणार्‍या कॅनडावर आर्थिक मंदीचे सावट निर्माण झाले आहे.

तुम्ही ईडीसमोर उपस्थित का होत नाही ? – उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री केजरीवाल यांना प्रश्‍न

देहली उच्च न्यायालयाने देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मद्य घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाला (‘ईडी’ला) समन्स बजावले. न्यायालयाने  ईडीला तिची बाजू मांडण्यासाठी २ आठवड्यांची मुदत दिली आहे.

भारतविरोधी घोषणा देणार्‍यांवरील आरोपपत्र रहित करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाचा नकार !

अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंदिरात धार्मिक प्रवचन चालू असतांना भारतविरोधी घोषणा दिल्याच्या प्रकरणी तिघांच्या विरोधातील आरोपपत्र रहित करण्यास नकार दिला.

Myanmar Rohingya Killed : म्यानमारमध्ये झालेल्या हवाई आक्रमणात २५ रोहिंग्या मुसलमान ठार !

संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता !

मेफेड्रोन तस्करीच्या प्रकरणात गुन्हे शाखेकडून पुणे आणि देहली येथे धाडी !

मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पसार झालेला आरोपी महंमद उपाख्य पप्पू कुरेशी याला कर्नाटकातील यादगीर भागातून नुकतीच अटक करण्यात आली. कुरेशी याने साथीदार हैदर शेख, अशोक मंडल, संदीप धुनिया आणि शोएब शेख यांच्याशी संगमनत करून पुणे आणि देहली येथील गोदामात मेफेड्रोन ठेवले होते.

‘इंडी’ आघाडीकडून हिंदूंनाच केले जात आहे लक्ष्य ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष आदी राजकीय पक्षांकडून हिंदु धर्माच्या विरोधात सातत्याने होत असलेल्या टीकेवरून हिंदूंना ‘आमचा शत्रू कोण आहे ?’, याचा बोध झाला आहे. हे एकप्रकारे लाभदायकच ठरत आहे. यामुळे यंदाही निवडणुकीत हिंदू या सर्वांना घरीच बसवणार, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे !