Bengaluru Shopkeeper Assault Case : हनुमान चालिसा लावल्यावरून दुकानदाराला मारहाण करणारे सर्व आरोपी अटकेत !

पोलिसांनी गुन्हा नोंदवतांना हनुमान चालिसाचा उल्लेख वगळला !

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील नगरथपेट भागात जुम्मा मशीद मार्गावर भ्रमणभाष विक्रीच्या दुकानात हनुमान चालिसा लावल्यावरून दुकानदाराला मारहाण करणार्‍या सर्व ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सुलेमान, शहनवाज, रोहित, डॅनिश, तरुण उपाख्य दडीया आणि एक अल्पवयीन मुलगा असे हे ६ जण आहेत. अल्पवयीन मुलाला न्यायालयाने बालसुधारगृहात ठेवण्याचा आदेश दिला, तर अन्य सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी गुन्हा नोंदवतांना यात दुकानदाराने हनुमान चालिसा लावल्याने त्याला मारहाण करण्यात आली, याचा उल्लेखच केलेला नाही.

या प्रकरणाचा प्रमुख आरोपी सुलेमान भाड्याचे वाहन चालवण्याचे काम करतो. त्यावर यापूर्वीच काही गुन्हे नोंद आहेत. शाहनवाज बेरोजगार आहे, तर रोहित औषधांच्या दुकानांना औषधे पुरवतो. तरुण खासगी रुग्णालयात वॉर्ड बॉय होता. सुलेमान आणि त्याची टोळी यांच्यावर हॉटेल मालक सतीश यांच्यावर आक्रमण केल्याचा आरोप आहे.

संपादकीय भूमिका

पोलिसांच्या अशा वागण्यातून ते या गुन्हेगारांना साहाय्य करत आहेत, हेच लक्षात येते ! काँग्रेसच्या राज्यात अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता अल्पच आहे !

  • मुख्य सूत्रधार सुलेमान याच्या भावाने व्हाट्सअ‍ॅपवर ठेवला स्टेट्स !

  • आज जेल, उद्या बेल (जामीन), पुन्हा तोच खेळ !

पोलिसांनी ६ जणांना अटक केली असली, तर धर्मांधांवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. अटक झालेल्यांपैकी सुलेमानचा भाऊ सय्यद याने व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटसद्वारे हे दाखवून दिले आहे. यात म्हटले आहे, ‘आज जेल (कारागृह), उद्या बेल (जामीन), पुन्हा तोच खेळ (गुंडगिरी)’ सय्यद अल्पवयीन असल्याचे म्हटले जात आहे. (अल्पवयीन असतांना धर्मांधांची मानसिकता कशी आहे, हेच ही घटना स्पष्ट करते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, म्हणणारे यावर तोंड उघडतील का ?