भारतविरोधी भूमिका घेणार्‍या कॅनडावर आर्थिक मंदीचे सावट !

नवी देहली – मालदीवने भारतविरोधी भूमिका घेतली आणि त्यानंतर त्याची परिस्थिती बिकट झाली. मालदीवनंतर आता भारताला विरोध करणार्‍या कॅनडावर आर्थिक मंदीचे सावट निर्माण झाले आहे. कॅनडामध्ये दिवाळखोरी घोषित करणार्‍या आस्थापनांची संख्या वेगाने वाढत आहे. केवळ जानेवारी महिन्यात ८०० आस्थापनांनी दिवाळखोरीसाठी अर्ज केले आहेत.

१. देशाची अर्थव्यवस्था बळकट आहे; परंतु लहान आस्थापना आणि अन्य ग्राहक यांना संघर्ष करावा लागत आहे, असा दावा कॅनडा सरकारने केला आहे.

२. मागील तिमाहीत कॅनडाच्या सकल देशांतर्गत उत्पन्नामध्ये (जीडीपीमध्ये)१.१ टक्के घसरण झाली होती. सतत २ तिमाहीत घसरण झाली, तर मंदी म्हटले जाते. यामुळे जानेवारीत ८०० आस्थापनांनी दिवाळखोरीसाठी अर्ज केल्यामुळे कॅनडासमोर संकट निर्माण झाले आहे.

३. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.