माहिती देण्याचे नाकारल्याने कारवाई !
मिरज (जिल्हा सांगली), २२ ऑक्टोबर (वार्ता.) – तालुक्यातील मालगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामविकास (माहिती) अधिकारी सुरेश जगताप यांच्याकडे सदाशिव दोडवाड यांनी माहिती अधिकार अधिनियमानुसार आवेदनाद्वारे माहिती मागवलेली होती; पण जगताप यांनी ती नाकारल्याने राज्य माहिती आयोगाने २५ सहस्र रुपयांचा दंड जगताप यांना ठोठावला असून ही रक्कम त्यांच्या वेतनातून वसूल करण्याचा आदेश दिला. (अशा अकार्यक्षम अधिकार्यांवर आणखी कठोर कारवाई व्हाती, असेच जनतेला वाटते. – संपादक)
आवेदनदार दोडवाड यांनी माहिती मिळवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात केलेले आवेदन, त्या संदर्भात मिरज पंचायत समितीत केलेले अपील आणि राज्य माहिती आयोगाचा आदेश या संदर्भात जगताप यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे राज्य माहिती आयोगाने सुरेश जगताप यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.